म्हसवड येथे माणदेशी रामोशी वधू-वर पालक विधवा-विधुर सुचक परिचय मेळावा संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

म्हसवड  ( प्रतिनिधी ):-

     म्हसवड ता.माण जिल्हा.सातारा येथिल सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये आज माणदेशी रामोशी वधू-वर पालक विधवा-विधुर सुचक परिचय मंडळाच्या वतीने बेरड,बेडर,रामोशी समाजाचा वधू-वर पालक विधवा-विधुर सुचक परिचय मेळावा संपन्न झाला.

           या मेळाव्याला सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसवडचे सचिव श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.तर या मेळाव्याला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा परिचय प्रा.आनंदराव जाधव सरांनी करून दिला.कार्यक्रमाच प्रास्ताविक कृषी अधिकारी श्रीमंतराजे बुधावले साहेब यांनी केले.

      निवृत कृषी अधिकारी सुखदेव चव्हाण साहेब या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.तर राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांचे विशेष कार्यकारी अधिकारी रविराज जाधव साहेबांनी रामोशी समाजातील मुलांमुलीच्या लग्नाकरीता आयोजित केलेल्या माणदेशी रामोशी वधू-वर पालक विधवा-विधुर सुचक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमाच कौतुक करून रामोशी समाजासाठी असे उपक्रम राबविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर केलेल्या भाषणात सांगितले.

     या मेळाव्यास माणदेशी रामोशी वधू-वर पालक विधवा-विधुर सुचक परिचय परिवारातील कृषी अधिकारी श्रीमंतराजे बुधावलेसाहेब, मोतीराम बोडरे गुरुजी,जय महाराष्ट्र क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते विष्णू आप्पा चव्हाण, निवृत्त पाटबंधारे उप अभियंता शिवाजी चव्हाणसाहेब,सुनिल काका जाधव जय मल्हार क्रांती संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष व भाजपा सचिव माळशिरस तालुका, मधुकर चव्हाण सर, ॲड.विठ्ठल मंडले, समर्थ जाधव, लक्ष्मण जाधव सर संपादक साप्ताहिक भगवा संदेश, गावकामगार तलाठी ( महसूल अधिकारी)माधुरी चव्हाण-मंडले,आण्णा जाधव गुरुजी ( महाराज ), गजानन जाधव गुरुजी, मल्हारी जाधव गुरुजी, शंकर चव्हाण सर,उमेश चव्हाण, बयाजी जाधव,महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांचे विशेष कार्यकारी अधिकारी रविराज जाधव साहेब, सांगली जिल्हा परिषदेचे निवृत्त उप अभियंता संजय मदने साहेब, बाबुराव जाधव गुरुजी,मोहन महाराज बुधावले, प्रदीप बोडरे,संजय चव्हाण, सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसवडचे प्राचार्य प्रविण दासरे सर इत्यादी मान्यवरासह रामोशी समाजातील शेकडो वधू-वरांसह त्यांचे पालक विशेषतः महिलांची उपस्थिती ही उल्लेखनीय होते व महिलांचा सहभाग हा लक्षणीय होता म्हणजे सुमारे अडीचशे समाज बांधव होती.

        शेवटी लक्ष्मण जाधव सरांच्या आभार प्रदर्शनाने मेळाव्याची सांगता झाली. आजपर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमांच्या तुलनेने या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लक्षणीय होती व कार्यक्रमांमध्ये दिवसेंदिवस प्रगती होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *