महाराष्ट्र शिवसैनिक ऋषिकेश साठे यांचा अनोखा निश्चय … पाऊल पडले… ध्येय ‘शिवतीर्थ’!
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते उंब्रज कराड
दुधोंडी गावचा एक कट्टर महाराष्ट्र सैनिक, ऋषिकेश साठे, आपल्या लाडक्या नेत्याच्या – . राजसाहेब ठाकरे यांच्या उदंड आयुष्यासाठी आणि राजकीय यशासाठी एक अनोखा निश्चय तथा अनोखी वारी करत आहे.

दुधोंडी गावचे ग्रामदैवत आई शिवभवानीचे आशीर्वाद घेऊन, ऋषिकेशने दुधोंडी ते शिवतीर्थ (दादर, मुंबई) हा प्रवास सायकलवरून सुरू केला आहे. आज उंब्रज येथे आगमन झाल्यावर, अमोल सुभाष कांबळे यांनी स्वागत केले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून ऋषिकेशचा जंगी सत्कार करण्यात आला आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सातारा जिल्हा सचिव अमोल सुभाष कांबळे, तालुका अध्यक्ष रणजीत कदम, शहर अध्यक्ष विजय वाणी, गट अध्यक्ष राजेंद्र वाकडे, तसेच अनिल महाजन, सुयोग्य घोरपडे आणि अनेक महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऋषिकेशच्या या जिद्दीला आणि राजसाहेबांवरील प्रेमाला मानाचा मुजरा! महाराष्ट्र सैनिकाचा निर्धार, आता मुंबईच्या दिशेला!

