जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार नितीन बानगुडे पाटील
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते उंब्रज कराड
येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट स्वबळावर पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे प्रतिपादन नितीन बानुगडे पाटील संपर्कप्रमुख यांनी उंब्रज येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मध्ये केले.
महाराष्ट्रात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड उत्तर मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक हॉटेल सरोवर उंब्रज येथे पार पडली.
नितीन बानगुडे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व ठिकाणी एकत्रितपणे लढलो येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर महाविकास आघाडी मधील घटक पक्षांनी जर आम्हाला सन्मान पूर्ण वागणूक दिली नाही तर पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर लढणार. शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे की 80 टक्के समाजकारण आणि 20% राजकारण बऱ्याच नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी पक्ष बदलला पण मूळ शिवसैनिक कुठेही गेला नाही. भारत हा लोकशाहीवर चालणारा देश आहे पण लोकशाहीला तडा गेल्याचे सध्याचे चित्र आहे राजकारणाची दिशा बदलली आहे, तत्त्व, निष्ठा, विचार, मूल्य राहिली नाहीत नेते सकाळी एका पक्षामध्ये तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षामध्ये असे सध्याचे चित्र आहे. ‘सत्ताधारी असूरी राजकारण खेळत आहेत, हणबरवाडी धनगरवाडी योजना आमच्या काळामध्ये प्रभावीपणे राबवण्याचे काम आम्ही केले. जल जीवन योजनेचे अकरा हजार कोटी गेले कुठे? उंब्रज सारख्या गजबजलेल्या गावांमध्ये अजूनही जलजीवन योजनेची कामे रखडलेली आहेत विकास बेरोजगारी, महागाई, या विषयांवर सत्ताधारी निवडणुका लढताना दिसत नाहीत बोगस मतदानाविषयी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मोर्चे काढले पण त्याचा परिणाम दिसला नाही जाणून-बजून निवडणुका पुढे ढकलायच्या . पाटण पंढरपूर राज्य मार्गाचे काम सुरू आहे भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना अजूनही जमिनीचा मोबदला मिळाला नाही आम्ही त्यांच्यासोबत आहोत जर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तर लढणार नाही तर प्रत्येक गण आणि गटामध्ये स्वबळावर लढणार. तसेच पत्रकारांनी मनसे सोबत कराड उत्तर मध्ये युती करण्याचे विचारले असता त्यांनी यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अधिकृत घोषणा करतील असे सांगितले.
यावेळी शिवसेना उपनेत्या .छायाताई शिंदे, महिला आघाडी प्रमुख अनिता जाधव, संपर्क प्रमुख शशिकांत पिसाळ,संजय भोसले,किरण कदम, उपतालुकाप्रमुख जिवन गायकवाड, संदिप थोरात,रामकृष्ण शिंदे, प्रमोद ढाणे, शिवाजीराव डुबल,प्रदिप पोळ,सतीष पाटील, उध्दव घोलप, युवासेना तालुका प्रमुख विक्रम पिसाळ, संदिप सपकाळ,चंदा पवार, हर्षदा पवार, अधिकराव जाधव, महेश काकडे, बाळासाहेब मोहिते, गणेश जांभळे, राजेंद्र घाडगे उमेश अतकरी, आप्पासो माने, सोमनाथ लोहार, व उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.

