अर्धापूर तालुका पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी उध्दवराव सरोदे यांची नियुक्ती
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
उध्दवराव सरोदे
नांदेड : (अर्धापूर ) :प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या अर्धापूर तालुका पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी उध्दवराव सरोदे यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा व कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार वैष्णवी स्टील अॅन्ड हार्डवेअर, अर्धापूर येथे करण्यात आला.
हा सत्कार भाजपा युवा मोर्चाचे भावी जिल्हाध्यक्ष व नगर पंचायत अर्धापूरचे मा.नगरसेवक तुकाराम साखरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरोदे यांच्यासह बिबिशन कांबळे, अॅड.गौरव सरोदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास नगर पंचायत अर्धापूरचे मा.नगरसेवक शिवराज जाधव, गणेश माने, परमेश्वर काळे, विठ्ठल साखरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

