भिम आर्मी व आजाद समाज पार्टीच्या विभागीय मराठवाडा बैठकीस उपस्थित राहण्याचे आव्हान – प्रभाकर वाघमारे
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
नांदेड प्रतिनिधी – उध्दव सरोदे
नांदेड : आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवार चाचणी, समीक्षा व पक्ष बांधणीसंदर्भात भिम आर्मी व आजाद समाज पार्टीची विभागीय मराठवाडा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही विशेष बैठक दिनांक १९ सप्टेंबर रोजी शुक्रवार, दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे होणार आहे. या बैठकीत उमेदवारांची तयारी, संघटनात्मक आढावा तसेच आगामी निवडणुकीसाठीची दिशा यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून पार्टीचे केंद्रीय प्रभारी महाराष्ट्र राज्य मा. गौरी प्रसाद उपासक, राज्य प्रभारी मा. रुपेशजी बागेश्वर, संयोजक व राज्य उपाध्यक्ष तसेच मराठवाडा प्रभारी सत्यजित साळवे, मा. किशोरजी मस्के (महाराष्ट्र सचिव), बलराज दाभाडे (मराठवाडा अध्यक्ष) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
बैठकीचे आयोजक अशोक वाळवळ (मराठवाडा उपाध्यक्ष), विनायकजी लोहकरे (उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष), मा. किरणजी सदावर्ते (दक्षिण नांदेड जिल्हाध्यक्ष), जिल्हा महासचिव गोविंद चाटसे, सचिव किशोर जोंधळे, देवानंद जोंधळे, संतोष जोंधळे आदी पदाधिकारी उपस्थित राहतील. तसेच तालुका, विधानसभा, सेक्टर व बूथस्तरावरील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रभारी तरुण तडफदार, मेहनती व अभ्यासू नेते प्रभाकरराव वाघमारे यांनी केले आहे.

