कराड शहर पोलीस ठाण्याची मोठी कारवाई – रसायनयुक्त बनावट देशी दारू निर्मिती करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन आरोपी अटक

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड – प्रतिनिधी
कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत मानवी जीवितास अपायकारक अशी रसायनयुक्त बनावट देशी दारू तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण रु. 11,38,550 किंमतीचे साहित्य, दारू, रसायन आणि दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.ए. ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता गोपनीय माहितीवरून ओगलेवाडी दुरक्षेत्र हद्दीत पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत

1. मयुर कृष्णदेव कदम (रा. करवडी, कराड)

2. विजय शिवाजी निगडे (रा. शिरवळ, कराड)

3. मंदार कृष्णदेव कदम (रा. करवडी, कराड)
हे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले.

त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ (MH 12 GK 8256) व मारुती सुझुकी 800 (MH 12 CE 774) या वाहनांतून बनावट टाँगो पंच दारूच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या, रसायन भरलेले कॅन, तसेच अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये बॉटलिंग मशीन व इतर साहित्य मिळाले.

सदर आरोपींनी बनावट देशी दारू तयार करून ती विक्रीसाठी बाजारात पाठविण्याचा बेत आखला होता. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करून हा गंभीर प्रकार उघड केला. आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना एमसीआर मंजूर झाला असून पुढील तपास पो.उ.नि. कृष्णा डीसले करत आहेत.

ही कारवाई सपोनि राजेश माळी, सपोनी अशोक भापकर, पोउनि निखील मगदुम, पो.उ.नि. कृष्णा डीसले, पो.उ.नि. सतिश आंदेलवार यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस पथकाने केली.

कराड शहर पोलीस ठाण्याच्या या कारवाईचे सातारा जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *