पोरे परिवाराकडून श्री सिद्धनाथ-जोगेश्वरी मंदिरात फळा-फुलांची देखणी आरास

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
प्रतिनिधी – म्हसवड

म्हसवड नगरीचे आराध्य दैवत आणि दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे श्री सिद्धनाथ माता-जोगेश्वरी मंदिर श्रावण महिन्यातील शेवटच्या रविवारी भक्तांच्या उपस्थितीने गजबजले होते. या पवित्र दिवशी शुभम भारत गॅस एजन्सीचे सर्वेसर्वा इंजी. सुनील पोरे व सौ. सुवर्णा पोरे यांच्या परिवाराकडून श्रींना दहीभात महापूजा अर्पण करून गाभाऱ्यात आकर्षक फळा-फुलांची आरास सजविण्यात आली.

श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी विविध अभिषेक परंपरेप्रमाणे भक्त आपापल्या श्रद्धेनुसार दहीभात, खवा, फळे वा चंदनाचा लेप अर्पण करतात. त्याच परंपरेत यंदा पोरे परिवाराने साकारलेली फळाफुलांची आरास विशेष आकर्षण ठरली. विविधरंगी फुलांनी सजवलेला गाभारा आणि फळांची कलात्मक मांडणी यामुळे मंदिराचे सौंदर्य खुलून आले.

महाआरती, प्रदक्षिणा आणि भक्तीमय वातावरणात झालेल्या या पूजेस महेश सोनवले यांनी केलेली पायघड्या व रांगोळीची कलाकुसर विशेष शोभा आणणारी ठरली.

पोरे परिवाराने केलेल्या या सुंदर आरासेमुळे श्रावणातील शेवटचा रविवार भक्तांसाठी अविस्मरणीय ठरला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *