दहिवडी पोलीस स्टेशनतर्फे नशामुक्त भारत अभियानांतर्गत व्याख्यान, निबंध स्पर्धा व रॅलीचे आयोजन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ न्यूज संपादक अहमद मुल्ला
दहिवडी (ता. माण) –प्रतिनिधी

नशामुक्त भारत अभियानाच्या अनुषंगाने दहिवडी पोलीस स्टेशनतर्फे विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. नूतन पोलीस अधीक्षक मा. तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक मा. वैषाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. आश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम पार पडले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, पोलीस हवालदार विजय खाडे, पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र गाढवे, निलेश कुदळे व सुहास गाडे यांनी दहिवडी कॉलेज आणि महात्मा गांधी विद्यालय येथे नशामुक्ती विषयावर व्याख्यान घेतले. तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

 

स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना ध्वजारोहण कार्यक्रमावेळी पोलीस परेड ग्राऊंड, दहिवडी येथे प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मा. उज्वला गाडेकर यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे:

दहिवडी कॉलेज, दहिवडी

प्रथम क्रमांक (₹3,000) – कुमारी अंकीता राजाराम अवघडे (इ. ११ वी सायन्स)
द्वितीय क्रमांक (₹2,000) – आरती मारुती सावंत (बी.कॉम)
तृतीय क्रमांक (₹1,000) – श्रावणी अमृत शेलार (इ. ११ वी सायन्स)

महात्मा गांधी विद्यालय, दहिवडी

प्रथम क्रमांक (₹3,000) – कुमारी प्रतीक्षा दिपक शिंदे (इ. ११ वी)
द्वितीय क्रमांक (₹2,000) – कुमारी सई विठ्ठल भांड (इ. ११ वी)
तृतीय क्रमांक (₹1,000) – कुमारी अक्षरा सतीश जगदाळे (इ. ११ वी)


याशिवाय, दहिवडी शहरात पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड व पोलीस पाटील यांच्या सहभागाने नशामुक्ती संदेश असलेले बॅनर घेऊन रॅली काढण्यात आली. या अभियानांतर्गत पुढील काही दिवसांत आणखी विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *