देवापूच्या विद्यार्थ्यांची सीईटी मध्ये सलग तिसऱ्या वर्षी यशस्वी वाटचाल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड :प्रतिनिधी
देवापूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या शाखेतील इयत्ता बारावी सीईटी प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी एम.एच.टी-सीईटी 2025 मध्ये सलग तिसऱ्या वर्षी यशस्वी वाटचाल करून उज्वल यश संपादन केले .
त्यामुळे *कशाला जाताय पुणे लातूर येऊन पहा आमचे देवापुर* ही टॅग लाईन पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. चालू वर्षी एकूण नऊ विद्यार्थ्यांनी 90%टाईल पेक्षा अधिक गुण मिळवले. त्यामध्ये अनुक्रमे
सातपुते शुभम 99.38% टाईल,मदने प्रतीक्षा 99.18%टाईल,  विरकर काजल 96.40%टाईल, सूर्यवंशी सिद्धेश 96.33%टाईल,माने साक्षी 94.78%टाईल,

पानसांडे यश 91.93%टाईल,
मदने स्नेहा 91.77%टाईल,
विरकर अविष्कार 91.29%टाईल, काटे सार्थक 91.23%टाईल यांचा समावेश आहे. तसेच एकूण पंधरा विद्यार्थ्यांनी 80%टाईल पेक्षा अधिक गुण प्राप्त करून यश संपादन केले. सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ देवापूरचे सरपंच माननीय श्री तात्यासाहेब अवताडे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री शहाजी बाबर, श्री कृष्णा बाबर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री किरण बाबर, श्री नवनाथ चव्हाण, यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्था पदाधिकारी, अधिकारी, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती,ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री कोरडे एम.आर, माजी प्राचार्य श्री माने टी.एस, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री पाटील बी.एन,पर्यवेक्षक श्री चिंचकर डी.एल, सीईटी प्रमुख सोळसकर एस.ए ,सर्व मार्गदर्शक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *