कराड उत्तरच्या शिवसेनेला नवी संजीवनी : तालुकाप्रमुख तुषार निकम यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
कुलदीप मोहिते
कराड उत्तर : प्रतिनिधी
शिवसेना कराड उत्तरचे तालुकाप्रमुख श्री. तुषार निकम यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख श्री. एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दरे गावी जाऊन भेट घेतली. या भेटीत कराड उत्तर विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्षाची ताकद वाढवणे, कार्यकर्त्यांना बळ देणे, “गाव तिथे शिवसेना शाखा” ही संकल्पना राबवणे तसेच विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी प्रभावी नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कराड उत्तरमधील शिवसैनिकांच्या बळकटीसाठी तुषार निकम यांना ‘शिव संजीवनी’ दिली असून, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे पक्षप्रमुख म्हणून वैयक्तिक लक्ष घालण्याचे आश्वासनही दिले. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे कराड उत्तरमधील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य आणि जोश निर्माण झाला आहे.

तालुकाप्रमुख तुषार निकम यांनी सांगितले की, लवकरच कराड उत्तरमधील शिवसेनेची बैठक घेऊन पक्षाची ध्येयधोरणे, विकासकामे, सदस्य नोंदणी मोहीम यासह पक्षवाढीसाठी आवश्यक असलेल्या अंमलबजावणीचा अहवाल तयार करून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे सादर केला जाईल.

या भेटीमुळे कराड उत्तरच्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाली असून, शिवसेना पक्ष अधिक जोमाने विस्तारेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!