श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त पुरदांवडे/सदाशिवनगर येथे भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन — आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व आमदार उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक : अहमद मुल्ला )
म्हसवड : प्रतिनिधी
मौजे पुरदांवडे/सदाशिवनगर येथे श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त पारंपरिक व प्रतिष्ठेची मानली जाणारी भव्य बैलगाडी शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली. या शर्यतीच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन देखील तेवढ्याच थाटामाटात करण्यात आले. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार मा. श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील व विधान सभेचे आमदार मा. श्री. उत्तमराव जानकर यांनी उपस्थित राहून विजेत्यांचा गौरव केला.

या प्रसंगी मा. सौ. सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते-पाटील, मा. श्री. विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, तसेच मा. सौ. शिवंशिकाराजे विश्वतेजसिंह मोहिते-पाटील यांचीही उपस्थिती लाभली.

या शर्यतीमध्ये विविध गावांतील बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्पर्धा अधिकच चुरशीची झाली. स्पर्धेत विजेते ठरलेले बैलगाडी मालक आणि क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत:

प्रथम क्रमांक : शंभु महादेव व अक्षक शेठ पिसाळ, किरण भाऊ खताळ (शेवर) — हिराशेठ बबन शेठ चोरमले यांची ‘कॅप्टन माळशिरस’
द्वितीय क्रमांक : श्री गुरुदत्त प्रसन्न, साई भैया साहेब माळशिरस
तृतीय क्रमांक : श्री कव्देरसिद्ध प्रसन्न, संत बाळुमामा प्रसन्न
चतुर्थ क्रमांक : गुरुदत्त प्रसन्न, इस्टर 1213, मारकडवाडी
पंचम क्रमांक : आकाश पाटील, सदाशिवनगर व प्रथमेश हॉटेल, पळसमंडळ


यावेळी परिसरातील सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, विविध पदाधिकारी, श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे सदस्य, बैलगाडी मालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भव्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन पै. श्री. विठ्ठल अर्जुन यांनी केले. त्यांच्या कार्याची दखल घेत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व आमदार उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!