कलावंत संकटात, मदतीची गरज – प्रकाश देसाई यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करा

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
मुंबई प्रतिनिधी – गणेश तळेकर

चार दशके रंगभूमीला समर्पित आयुष्य… अभिनय, दिग्दर्शन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक कलावंत घडवणारे श्री. प्रकाश देसाई आज स्वतः अडचणीत सापडले आहेत. 45 वर्षे रंगभूमीवर सेवा देणाऱ्या या प्रतिभावान कलाकाराला सध्या वैयक्तिक जीवनात मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

प्रकाश देसाई यांना अलीकडेच पक्षाघात (लकवा) झाल्याने ते हालचाल करु शकत नाहीत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र आर्थिक स्थिती हालाखीची झाली आहे. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबावर दुहेरी-तिहेरी संकटे कोसळली आहेत. त्यांची पत्नी सध्या मुंबईतील प्रसिद्ध KEM रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांनाही गंभीर प्रकृतीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय त्यांचा ४० वर्षांचा मुलगा सुद्धा आजारी आहे, त्यामुळे संपूर्ण कुटुंब निराधार आणि अडचणीत सापडलं आहे.

प्रकाश देसाई हे एक समर्पित नाट्य प्रशिक्षक आणि कलावंत म्हणून अनेकांच्या आठवणीत आहेत. अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी नाट्यशिक्षण दिलं, मार्गदर्शन केलं आणि रंगभूमीवर उभं केलं. अशा या कलाकाराची आज समाजाकडून, कलावंतांमधून आणि कलाप्रेमींमधून थोडीशी मदत अपेक्षित आहे.

आपण या संकटसमयी मदतीचा हात पुढे कराल का?
अत्यंत नम्र विनंती – ज्या कोणाला शक्य असेल त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क करून किंवा त्यांच्या वैद्यकीय व आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा.

संपर्क:
श्री. प्रकाश देसाई (नाट्य प्रशिक्षक, दिग्दर्शक, अभिनेते)
फोन: +91 83699 82762

कलावंतासाठी कलावंत आणि कलाप्रेमी एकवटले, तर ही मदतीची साखळी त्यांचं आयुष्य थोडं सुसह्य करू शकेल.

– गणेश तळेकर,
आपला कलाप्रेमी मित्र


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!