सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या पथकाची मोठी कारवाई – अवैध वाळू वाहतूक प्रकरणी एकाला अटक
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या पथकाने अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 7 लाख 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मानगंगा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने म्हसवड, शिरताव आणि पूळकोटी या मार्गांवर सापळा रचला.
दरम्यान, शिरताव ते पूळकोटी रस्त्यावर बनगरवाडी गावच्या पूलाजवळ एक लाल रंगाचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली संशयास्पदरीत्या उभी असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू आढळली.
याप्रकरणी सुरज महादेव गोरवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळू असा एकूण 7 लाख 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सातारा जिल्ह्यात अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
ही कारवाई माननीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, सतीश जाधव, अनिल वाघमोडे, संतोष काळे, योगेश सूर्यवंशी, भास्कर गोडसे, राहुल थोरात आणि विनोद सपकाळ यांचा समावेश होता.
सातारा जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधातील मोहिमेअंतर्गत पोलीस प्रशासनाच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.