म्हसवड येथे सिटी मॉल कापड दुकानाचे ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

बातमी Share करा:

व्हिजन २४तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड, :
ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि इंजि. सुनील पोरे (नासप जिल्हाध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हसवड येथील सिटी मॉल कापड दुकानाचे उद्घाटन मोठ्या धूमधामात संपन्न झाले. उद्घाटन समारंभास नासप राज्य अध्यक्ष संजय नेवासकर, सचिव डॉ. अजय फुटाणे, नितीन दोशी, युवराज सुर्यवंशी, करण भैय्या पोरे, दत्ता भागवत, डॉ. दोलतडे, विक्रम जाधव, सौ. सुवर्णा पोरे, मॉडर्न स्कूलच्या पवार मॅडम, सदाशिव सावंत, नारायण मासाळ, नामदेव चांदवले तसेच पंचक्रोशीतील अनेक महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिटी मॉल कापड दुकानाची स्थापना १९४० साली विजयशेठ चांडवले यांच्या आजोबांनी केली होती, आणि आज पाचवी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे. या व्यवसायाचा इतिहास आणि त्याची गुणवत्ता स्थानिक ग्राहकांच्या विश्वासावर आधारित आहे. उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी या व्यवसायाच्या दीर्घकालीन यशस्विता आणि स्थानिक अर्थव्यवस्थेतील योगदानाबद्दल विशेष काढले.
सिटी मॉलमध्ये आता ग्राहकांना थेट फॅक्टरीकडून चांगल्या प्रतीचे कापड किफायतशीर दरात उपलब्ध होईल. हे दुकान स्थानिक कापड व्यवसायासाठी एक मोठी संधी ठरली असून, स्थानिकांसाठी हे एक महत्त्वाचे व पर्यायी बाजारपेठ ठरू शकेल. उद्घाटनाच्या वेळी, ग्राहकांना उत्तम प्रतीचे कापड मिळविण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले गेले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश म्हेत्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. राणी चांडवले यांनी मानले. या उद्घाटनामुळे म्हसवड आणि आसपासच्या क्षेत्रातील कापड व्यवसायाला एक नवीन उंची गाठता येईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!