सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी युवा नेते दाऊद मुल्ला यांची नियुक्ती
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड : प्रतिनिधी
सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी युवा नेते दाऊद मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार अण्णा यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे विविध मान्यवर उपस्थित होते.
दाऊद मुल्ला यांना पक्षातील कामगिरीबद्दल आणि ओबीसी समाजातील योगदानासाठी या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. या नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्याला पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, म्हसवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास गोंजारी, माजी सभापती व जिल्हा एस.सी विभागाचे उपाध्यक्ष विजय बनसोडे, जिल्हा सरचिटणीस विष्णुपंत अवघडे इत्यादींचा समावेश होता.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी दाऊद मुल्ला यांचे अभिनंदन केले व त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे ओबीसी समाजात पक्षाचे स्थान अधिक बळकट होईल आणि पक्षाच्या धोरणांमध्ये समाजाच्या प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दाऊद मुल्ला यांनी यावेळी बोलताना, पक्षाने दिलेल्या जबाबदारीसाठी आभार मानले आणि ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी निष्ठेने काम करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणांशी एकनिष्ठ राहून काम करण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला.
या कार्यक्रमामुळे सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाच्या पुढील कामकाजाला एक नवा आयाम मिळणार आहे.