पिंगळी खुर्द खांडसरी चौकात चारचाकी झायलो गाडी व मोटार सायकल अपघातात युवक ठार
म्हसवड –
सातारा पंढरपूर फोरलेन हायवेवरील पिंगळी खुर्द लगत आसणा-या खांडसरी चौकात गुरुवारदि २९ रोजी सकाळी झायलो गाडी नंबर MH15 CT 2351 ही गाडी सातारा येथुन गोंदवले बु. कडे निघाली होती तर तोरसेवस्ती पिंगळी येथील अविनाश तोरसे वय 22 हा MH11BH 3934 बजाज मोटारसायकल वरून दहिवडी कडे निघाला होता.
दरम्यान खांडसरी चौकात दोन्ही वाहानांचा समोरा समोर आपघात होऊन दुचाकीस्वार अविनाश तोरसे याचा जागीच मृत्यु झाला असून पुढील तपास दहिवडी पोलीस करीत आहेत.
दरम्यान घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अविनाश तोरसे हा तरूण एकुलता एक आहे त्याच्या घरची परिस्थिती हालाखीची असून त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.तसेच खांडसरी चौकात वारंवार आपघात होत आहेत या ठिकाणाहुन सांगलीकडे,सोलापूरकडे व सातारा,फलटण या ठिकाणाकडे जाण्यासाठी मुख्य मार्ग आहेत त्यामुळे सदर खांडसरी चौकात सर्व मार्गावर स्पिड बेकर होणे गरजेचे आसल्याचे अनेक नागरीकांनी मत व्यक्त केले.