मुख्यमंत्र्यांच्या सातारा येथील महत्त्वाच्या मीटिंगसाठी गेलेल्या लाडक्या बहिणीची एसटी बस अभावी गैरसोय
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :-
निवडक लाडक्या बहिणी एसटीने मुख्यमंत्र्यांच्या सातारा येथील महत्त्वाच्या मीटिंगसाठी आवर्जून आल्या होत्या. परंतु, त्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या एसटी बस सुविधा अभावी म्हसवड स्टॅंडवर शेकडो बहिणी व भावांची गैरसोय झाली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रात्रीचे सात वाजूनही ग्रामीण भागात जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एसटी बस उपलब्ध नसल्याने मुली, वृद्ध बायका,प्रवासी म्हसवड स्टॅंडवरच वाहनाच्या प्रतीक्षेत थांबलेले आहेत.या बाबत एसटी प्रशासनाला सूचना देणे आवश्यक होते या आडमुठ्या धोरणाबद्दल एसटी प्रशासनाविरुद्ध संतापाची भावना वाढली आहे. प्रवाशांचा आरोप आहे की, एसटी प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी पुरेशी व्यवस्था केली नाही, ज्यामुळे या गैरसोयीला तोंड द्यावे लागले.


