शासकीय योजनांचे मार्गदर्शन मेळावा…

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड
माण देशी फौंडेशन व समाजकल्याण विभाग यांचे संयुक्त विद्यमानाने शासकीय योजनांचे मार्गदर्शन मेळावा
शनिवार दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वा. येथील जोगेश्वरी मल्टीपर्पज हॉल सिध्दनाथ मंदिर पाठीमागे, म्हसवड येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी म्हसवड पंचक्रोशीतील नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण सिन्हा यांनी केले आहे.

           राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली जाणार असून यामध्ये प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मागासवर्गीय वित्त आणि विकास ओबीसी महामंडळ,
संत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ,
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ,
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ,
इतर मागास बहुजन कल्याण विभाग,समाज कल्याण विभाग,जिल्हा उद्योग केंद्र,समाज कल्याण विभाग महत्वाच्या योजना, यासह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरुन दिले जातील.
राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरीकांना होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरीकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण सिन्हा यांनी केले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!