दलित पॅंथर मार्फत नेत्र तपासणी व मोफत ऑपरेशन शिबीर संपन्न

बातमी Share करा:

लित पँथर सामाजिक संघटना माण तालुका व म्हसवड शहर एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, महंमदवाडी, हडपसर, पुणे यांचे सयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व मोफत ऑपरेशन शिबीर
 बाजार पटांगण विठ्ठल रुक्मिणी मंदीर म्हसवड येथे आयोजित करण्यात आले होते
 या शिबीराचे  उद्घाटन सपोनि राजकुमार भूजबळ ,सामाजिक कार्यकर्ते करण सिन्हा, डॉ.वाघमारे  (एच.व्ही.नेत्र रूग्णालय महंमदवाडी पुणे) यांचे शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान दलित पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ घनश्याम भोसले व म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन माने यांनी भूषविले
या शिबीरात ५०० लोकांची  डोळ्याची तपासणी करण्यात आली त्यातील ९० लोकांना ऑपरेशन साठी निवडण्यात आले १७७ लोकांना  चष्मा वाटप करण्यात आले या  कार्यक्रमाचेआयोजन दलित पॅंथर माण तालुका अध्यक्ष प्रमोद लोखंडे व सर्व दलित पॅंथरचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले होते
त्यावेळी  मा.धर्मराज लोखंडे , मा.लक्ष्मण काकडे सातारा जिल्हा अध्यक्ष दलित पँथर,  धर्मराज लोखंडे .किरण बनसोडे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष  धर्मराज लोखंडे, सोनू शिंदे मा.नवनाथ लोखंडे .भिमराव साठे .शहाजी लोखंडे वंचित, संतोष लोखंडे , विक्रम लोखंडे म्हसवड , आकाश बाबा माने  .सचिन लोखंडे .विकी लोखंडे .नितीन तुपे पत्रकार, राजेश लोखंडे  सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दलित पँथर सामाजिक संघटनेकडून माण तालुका व म्हसवड शहरात नेहमीच समाजहिताचे कार्य जोपासले जाते! म्हणून कार्यक्रमाच्या सर्वच मान्यवरांनी व म्हसवड शहर व परीसरातील जेष्ठ नागरिकांनी शिबिराचे व दलित पँथर संघटनेचे विषेश कौतुक करून समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!