*विवाह समारंभात केला मतदानाचा संकल्प …..!*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

गणेश मिंड

इंदापुर प्रतिनिधी

       अलीकडचे काळात मतदारांमध्ये मतदानाबाबत असलेला निरुत्साह आणि त्यामुळे मतदानाचे कमी होत असलेले प्रमाण आणि मतदान करणे हे लोकशाही बळकट करण्याचे काम आहे हे लक्षात घेऊन येत्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा संकल्प भिगवण येथे संपन्न झालेल्या एका विवाह समारंभात करण्यात आला.

       अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे विभागीय संघटक राजकुमार मस्कर यांचा मुलगा ओंकार आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड पांडुरंग जगताप यांचा पुतण्या व नामदेवराव जगताप यांचे चिरंजीव आतिश याचा शुभविवाह भिगवण येथील श्याम गार्डन या मंगल कार्यालयात गुरुवार दिनांक १८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. त्या विवाह सोहळ्यात उपस्थित सर्वांनी मतदानाचा संकल्प घेण्याचा एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला.

        विवाहपूर्वी दोन्ही वर-वधूंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन नंतर सर्वांना मतदानाचा संकल्प देण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांनी आपला उजवा हात समोर करून येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करून योग्य तो उमेदवार निवडून देण्याचा संकल्प केला. लोकशाही बळकट करण्याचे दृष्टीने अशा प्रकारचे उपक्रम उपयुक्त असल्याचे मत अ. भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी यावेळी व्यक्त केले.

      विवाह समारंभातील मान-पान, सत्कार समारंभ इत्यादी गोष्टींना फाटा देऊन राजकुमार मस्कर व नामदेवराव जगताप यांनी २१००० रुपयाचा धनादेश छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयातील ग्रंथ खरेदी करण्याकरिता इंदापूर न्यायालयातील सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती स्वानंदी वडगावकर श्री के सी कलाल साहेब व श्रीमती शितल साळुंखे तसेच इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष माधव शितोळे यांच्या हस्ते वाचनालयाचे पदाधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द केला सदर विवाह समारंभातील या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे..


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!