लोक संस्कृती टिकवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे………. रोहिणी शिंदे
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड: प्रतिनिधी —
कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथील रणरागिणी महिला मंडळ यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून रणरागिणी जल्लोष हा उपक्रम घेण्यात आला होता
या कार्यक्रमासाठी उद्योजिका सोनल भोसकर व कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे विद्या पावस्कर प्रमुख उपस्थित होत्या सोनलताई म्हणाल्या की महिला स्वतःच्या पायावरती सक्षम उभे राहून उद्योजक होऊ शकतात शासनाच्या योजना महिलांसाठी उपलब्ध आहेत ग्रामीण भागातील महिलांना पुढाकार घेऊन उद्योजक बनवण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे या कार्यक्रमासाठी रोहिणी शिंदे यांनी रणरागिनी महिला मंडळाचा सामाजिक उपक्रमास आणि ते करत असलेल्या कार्याची दखल शासन दरबारी घ्यावी अशी इच्छा यावेळी रोहिणी शिंदे यांनी व्यक्त केली त्या पुढे म्हणाले की आत्ताची युवा पिढी लोकसंस्कृती विसरत चालली आहे ती टिकवण्यासाठी महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून आपल्या लोकसंस्कृती भाषा टिकवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे माझ्यासारख्या मुलीला विचाराचा वारसा असलेल्या कराड शहर नगराध्यक्ष पद भूषवण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे अशा उपक्रमाला माझा नेहमीच पाठिंबा असेल


