श्री सिद्धनाथ रथाची अर्ध प्रदक्षिणा पूर्ण याला रथाचे तोंड फिरवणे असे म्हणतात.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
दिलीपराज किर्तने
  म्हसवड ( प्रतिनिधी )
म्हसवड चे ग्रामदैवत व लाखो भक्तांचे श्रध्दास्थान असलेले श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव अवघ्या काही दिवसांवर म्हणजे 13 डिसेंबर रोजी होत आहे, या रथोत्सवाची खरी सुरुवात आज कार्तीक शुध्द एकादशीच्या दिवसापासुन होत असते, एकादशी दिवशी श्रींचा शाही रथ हा यात्रा पटांगणातील रथगृहाबाहेर सर्व मानकर्यांच्या उपस्थितीत काढला जातो ही येथील परंपरा असुन या परंपरेनुसार आज शनिवार दि.9 रोजी रथ गृहाबाहेर येथील राजेंच्या उपस्थितीत काढत त्याचे पुजन सिध्दनाथाचे सालकरी, मठादिपती, मानकरी व राजेमाने परिवाराकडुन करून  रथाची अर्ध प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली.
म्हसवड यात्रेच्या पार्श्वभुमिवर दि. 13 डिसेंबर रोजी होत असलेल्या श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवाची प्रशासन , श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट,शहरवासिय, मानक-यांनी जोरदार तयारी केली आहे.
              श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता देवदिवाळीस म्हणजे बुधवार दि.१३ डिसेंबर रोजी वधू-वराची रथातून वरात काढून करण्याची परंपरा आहे. श्रींचा जो रथ आहे तो यंदा परंपरेनुसार  येथील माणगंगा नदीपात्रातुन जाणार असल्याने यंदाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या यात्रा नियोजनासाठी पालिका व प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. यात्रेच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी नुकतेच जिल्हा पोलिस अधिक्षक समिर शेख यांनी म्हसवड शहराला भेट दिली तर दि.४डिसेंबरला यात्रा नियोजनाचा आढावा घेण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची आढावा बैठक यापुर्वीच मंदिरात झाली आहे. या रथोत्सवासाठी एकादशी च्या दिवशी यात्रा पटांगणावरिल रथगृहातुन रथ नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर काढुन तो सजवण्याच्या लगबगी सुरु झाल्या आहेत. यावेळी रथाचे मानकरी म्हसवडचे राजे राजेमाने, माळी, लोहार, सुतार, गुरव आदी समाजातील मानक-याच्या उपस्थितीत हा रथ रथगृहातून बाहेर काढण्यात आला.
यावेळी श्री सिध्दनाथ मंदिराचे सालकरी महेश गुरव, मठाधिपती रविनाथ महाराज, रथाचे मानकरी श्रीमंत अजितराव राजेमाने, श्रीमंत गणपतराव आबासाहेब राजेमाने, श्रीमंत शिवराज आबासाहेब राजेमाने, श्रीमंत प्रतापसिंह राजेमाने, श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, श्रीमंत तेजसिंह राजेमाने, श्रीमंत दिपसिंह राजेमाने, श्रीमंत विश्वजीत राजेमाने, श्रीमंत सयाजीराजे राजेमाने आदी मानक-यासह माळी, लोहार, सुतार, गुरव समाजातील मानकरी उपस्थित होते.
========================
चौकट –
रथगृहाबाहेर येताच राजेमाने परिवाराने घेतली बैठक
नेहमीप्रमाणे श्रींचा शाही रथ हा रथगृहाबाहेर आल्यावर येथील राजेमाने परिवाराकडून सर्व मानकर्यांसोबत एक बैठक घेतली. त्या बैठकीत रथासंबधीच्या सर्व प्रश्नांवर एकत्रित चर्चा करून त्यावरील उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी केली जाते, जेष्ठ नेते श्रीमंत अजितराव राजेमाने यांनी परंपरेनुसार यात्रा पटांगणावरच बैठक घेवुन सर्वांना विविध सुचना केल्या व यंदाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडण्याचे आवाहन केले.
========================
यात्रा पंटागणावर लगबग – आजपासुन खऱ्या अर्थाने सिध्दनाथ यात्रेस सुरुवात होत असुन पुढील 5 व्या दिवशी येथील रथोत्सव संपन्न होणार आहे, त्यामुळे यात्रा पटांगणावर व्यावसायिकांची दुकाने लावण्यासाठी व माल तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे.
=============={========
यंदा यात्रेतील रंगत अधिक वाढणार – यात्रा म्हटले की हवसे, नवसे हे आलेच याबरोबरच यात्रेची जी खरी रंगत आहे ती पाळणे, तमाशा व तंबु हे ओघाने आलेच, मात्र अलिकडच्या बदलत्या काळानुसार नेमक्या याच गोष्टी कालबाह्य होवु लागल्या आहेत त्यामुळे यात्रेतील रंगतच सपंली आहे, यंदा मात्र पुन्हा एकदा सिध्दनाथ यात्रेत मोठ मोठे पाळणे, सिनेमाचा तंबु व तमाशा लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने यात्रेतील रंगत अधिक वाढणार आहे हे निश्चित.
========================
यात्रेत प्रथमच होणार कृषी प्रदर्शन –
सिध्दनाथ यात्रेच्या आजवरच्या इतिहासात कधीच कोणते प्रदर्शन झाले नाही यंदा मात्र प्रथमच येथील राजे श्रीमंत अजितराव राजेमाने यांच्या पुढाकाराने दि. १२ डिसेंबर ते१५ डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन संपन्न होत असुन हे कृषी प्रदर्शन सिध्दनाथ यात्रेचे मुख्य आकर्षण राहणार आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!