म्हसवड शहरात १२ डिसेंबर ते १५ डिसेंबर रोजी प्रथमच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन : जयसिंह राजेमाने

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
             म्हसवड शहराचे ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवी च्या यात्रेनिमीत्त म्हसवड शहरात प्रथमच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असुन, या कृषी प्रदर्शनाचा सर्व शेतकऱ्यानी लाभ घ्यावा असे आवाहन येथील आयोजक युवा नेते जयसिंह राजेमाने यांनी केले आहे.
              म्हसवड शहरात श्री. सिध्दनाथाचा रथोत्सव हा बुधवार दि. १३डिसेंबर रोजी संपन्न होत आहे, याकाळात शहरात मोठ्या प्रमाणावर यात्रा भरत असते, यानिमीत्त दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शहरात सुमारे ५लाखांहुन अधिक भाविक दर्शनासाठी येत असतात, हे भाविक दरवर्षी शहरात येतात श्रींच्या रथाचे दर्शन घेतात अन् निघुन जातात त्यामुळे यात्रा कालावधीवर त्याचा परिणाम झाला असून  प्रत्येकजण यात्राकाळ वाढला पाहिजे याची नेहमीच चर्चा करतोय पण यासाठी कृती अथवा ठोस उपाययोजना कोणीच करण्यास पुढे येत नाही त्यामुळे यात्रेचे काहीच वेगळेपण दिसुन येत नाही यात्रा कालावधी वाढला तर त्याचा शहरातील बाजारपेठेवर चांगला परिणाम होईल, शेतकरी वर्गालाही फायदा होईल याचाच विचार करून यंदा श्री. सिध्दनाथ यात्रेत प्रथमच  राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवले जाणार असल्याचेही राजेमाने यांनी सागितले.
                माण हा कायम दुष्काळी तालुका म्हणुन ओळखला जातो याच दुष्काळी मातीत शेतकरी आपल्या मेहनतीवर सोनं पिकवण्याची किमया करीत आला आहे, या शेतकऱ्यांना आधुनिक शेती व शेतीतील बदल, हवामान, औजारे खते, बी-बियाणे याची जर चांगली माहिती मिळाली तर त्याचा त्यांना नक्कीच चांगला फायदा होईल हाच उद्देश ठेवुन सदर कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सदरचे कृषीप्रदर्शन हे १२ डिसेंबर ते १५डिसेंबर या कालावधीत होणार असुन यामध्ये आरोग्यविभाग, कृषि विभाग, पशुवैद्यकिय विभाग, व जिल्हा बँक आदींचे महत्वाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत याद्वारे शेतकर्यांना विविध प्रकारची माहिती  नवनवीन शेतीची औजारे,खते, बी-बियाणे, यांची माहिती   संकलित करता येणार आहे. तर याव्यतिरीक्त विविधप्रकारची औजारे, खते, बी-बियाणे, ट्रॅक्टर, आदींसह खाद्यपदार्थांचीही स्टॉल लावली जाणार असुन सुमारे १५० हुन अधिक जणांनी यासाठी सकारात्मकता दर्शिवली आहे. असे ही शेवटी राजेमाने यांनी स्पष्ट केले.
चौकट –
कृषी प्रदर्शनात सहभागी होणार जातीवंत जनावरे –
म्हसवड शहरात प्रथमच होत असलेल्या या कृषी प्रदर्शनात सहभागी होणासाठी राज्यासह, राज्याबाहेरुनही जातीवंत नामचिन जनावरे दाखल होणार असुन हे कृषी प्रदर्शन पशुप्रेमींसाठी एक पर्वणी निश्चीतच ठरणार आहे.०००

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!