चारित्र्यावर संशय घेऊन दारुड्या पतीने केला पत्नीचा खून :म्हसवड पोलीसठाण्यात गुन्हा दाखल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड 
म्हसवड येथिल पोलीस ठाणे समोरच असणाऱ्या क्रांतीसुर्यनगर कॉलनीत राहणाऱ्या  आरोपी  धोंडिराम नाना पुकळे वय ४० वर्षे रा. पुकळेवाडी सध्या रा. रूम नं. १३, तिसला मजला, मालन निवास निवास क्रांतीसुर्यनगर, म्हसवड ता. माण याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन लाथाबुक्क्याने मारहान करुन खून केला याबाबतची फिर्याद मुलीचे वडील आबा महादेव कोडलकर, वय ५५ वर्षे,  रा. कोडलकरवाडी ता. माण जि. सातारा सध्या रा. कणेर ता. माळशिरस जि.सोलापुर यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल केली या घटनेची म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी 
         दि. ४/११/२०२३ रोजी संध्याकाळी ९.०० वाजता ते दि. ५/११/२०२३ रोजी दुपारी ३.०० वा चे दरम्यान रूम नं. १३, तिसला मजला, मालन निवास क्रांतीसुर्यनगर, म्हसवड ता. माण येथे  दिपाली धोंडिराम पुकळे वय ३२ वर्षे हिस तिचा पति धोंडिराम नाना पुकळे याने दारू पिवुन चारित्र्यावर संशय घेवुन तिला लाथाबुक्यांनी मारहाण करून व भिंतीवर व व्यायाम करायच्या डंबेलवर आपटुन गंभीर जखमी करून ठार मारले आहे. तसेच फर्शीवर व भिंतीवर पडलेले रक्त माझे नातु निखिल व आयुष यांच्याकडुन साफ करून घेवुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणुन तक्रारदार यांचे धोंडिराम नाना पुकळे वय ४० वर्षे रा. पुकळेवाडी सध्या रा. म्हसवड ता. माण जि. सातारा याचे विरूध्द कायदेशीर कारवाई होणे बाबतची फिर्याद मयत मुलीचे वडील आबा महादेव कोडलकर,यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली मजकूरचे खबरी वरून गून्हा दाखल करणेत आला असून  धोंडिराम नाना पुकळे याला त्वरीत अटक करण्यात आली घटना स्थळी अश्विनी शेंडगे सो. उपविभागीय पोलिस अधिकारी सो दहिवडी कँम्प वडूज या़नी भेट दिली असून अधिक तपास  स पो नि राजकुमार भुजबळ करत आहेत

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!