माण खटाव दुष्काळ जाहीर करावा –  राष्ट्रीय काँग्रेस* 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड :
ऑगस्ट महिना संपाला तरी माण व खटाव तालुक्यात अजूनही पावसाची हजेरी नाही सरकार ला जागे करण्यासाठी व दुष्काळ जाहीर करण्यासाठी तसेच  केंद्र व राज्य शासनाच्या चूकीच्या धोरणांमुळे जीवनावश्यक वस्तुंचे वाढलेले भाव, बेरोजगारी चा दर प्रचंड वाढलेला असतानाही वेगवेगळ्या सरळ सेवा भरती परिक्षांमध्ये होणारा गोंधळ, कांद्यावर लावण्यात आलेला निर्यात शुल्क याविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री.कुणालजी राऊत व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा युवक कॉंग्रेसच्या व माण -खटाव युवक कांग्रेसच्या वतीने दहीवडी येथे  २६ आगस्ट 2023 रोजी ११  वाजता दहीवडी येथे रास्ता रोको आंदोलन करन्यात  येनार असल्याची माहिती युवक कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सागर सावंत यांनी दिली..
 
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस प्रभारी उदय भानू जी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजित देशमुख जी जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव जी प्रदेश उपाध्यक्ष प्रशात ओगले जी सहप्रभारी एहसान खान जी , सातारा जिल्हा प्रभारी अनिकेत नवले जी प्रदेश प्रवक्ते दीपक राठोड, प्रदेश सरचिटणीस जयदीप शिदे, प्रदेश सरचिटणीस तारीख बागवाण,  प्रदेश सहसचिव निलेश काटे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष एम के भोसले, किसान काँग्रेस अध्यक्ष विश्वंभर बाबर सर माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, महिला अध्यक्ष नकुसा ताई जाधव ,प्रदेश सचिव प्राची ताकतोडे, प्रदेश सचिव हृषिकेश ताटे, जिल्हाउपाध्यक्ष  अमित जाधव, जिल्हा सरचिटणीस गंगाराम रणदिवे, जिल्हा सचिव सचिन गोरड,कराड दक्षिण अध्यक्ष दिग्विजय पाटील, मान खटाव विधानसभा उपाध्यक्ष पंकज पोळ ,खटाव तालुका उपाध्यक्ष  सलमान नदाफ, अनुसूचित जाती अध्यक्ष विजय बनसोडे अनिल लोखंडे, नगरसेवक विकास गोंजारी शिवाजी यादव, दाऊद मुल्ला उपस्थिती राहणार आहेत तरी माण खटाव च्या शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन डॉ.सागर सावंत यांनी केले

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!