दिवसा ढवळ्या घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीस दहिवडी पोलिसांनी अवघ्या ५ तासात पकडून संपूर्ण मुद्देमाल केला हस्तगत*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख
नाशिक पोलीस टाइम्स
सातारा जिल्हा प्रतिनिधी.
 *सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या स्टाफची धडाकेबाज कारवाई*

दिवसा ढवळ्या घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीस पकडून चोरलेला संपूर्ण मुद्देमाल केला हस्तगत केला
या बाबत  दहिवडी पोलीस ठाणेतून मिळालेली माहिती अशी
 दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील वावरहिरे गावातील बंद घर दिवसा ढवळ्या फोडून सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याचे कानातील झुमके अज्ञात इसमाने चोरून घेऊन गेले बाबत दहिवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाच्या अनुषंगाने तात्काळ गावात जाऊन माहिती घेतली असता गोपनीय माहिती समजली की प्रदीप प्रकाश धर्माधिकारी वय 26 वर्ष हा इसम काही दिवसांपासून संशयास्पदरीत्या गावात व इतर परिसरात हालचाली करत आहे..
 या अनुषंगाने शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले असता त्यानी हा गुन्हा केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने त्याला अटक करून त्याने लपवून ठेवलेले मंगळसूत्र व झुमके त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेले आहे..
 सदरची कामगिरी ही खालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
 1)सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे 2) महिला पोलीस हवालदार दया डोईफोडे3) पोलीस कॉन्स्टेबल अमर पाटोळे
4)पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!