दहिवडी  पोलिसांनी ईन्कम रुट या कोट्यावधींचा घोटाळा व चारा छावणीमधील आरोपी एकच आहेत का याचा तपास करावा  – संजय भोसले* 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
संजय भोसले
बिजवडी: 
    दहिवडी ता.माण पोलिस स्टेशनमधील कारभारी  झगमगत्या दुनियेमधील स्वयंघोषीत दादा,भाऊंच्या सामाजिक उपक्रमांमध्ये कायम रमताना,पिडीतांच्या प्रश्नांकडे नजर अंदाज का व कशासाठी करतात या व  अशा आशयाच्या चर्चा व  सूर  जनतेतून ऐकिवास येत असून कधीतरी  कर्तव्य समजून सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी  दहिवडी पोलिसांनी पुढे यावे असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दहिवडी पोलिसांना केले आहे. 

सध्या ईन्कम रुट ट्रेडर्स या कंपनीचे माध्यमातून  माण तालुक्यातील जनतेच्या कोट्यावधी रुपयांची झालेली फसवणूक व लूट दहिवडी पोलिस  का ?  नजरअंदाज करत आहेत असा सवाल करतानाच या प्रकरणामध्ये पोलिस दलातील एक मोठा अधिकारी व त्याचे नातेवाईकांचा  एजंट ते कोट्यावधी रुपयांच्या उलाढालीचे   गौडबंगाल उजेडात येऊ नये यासाठीचा खटाटोप सुरु आहे काय ? असा संशय जनतेतून निर्माण होत असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.तक्रारदार पोलिस स्टेशनात खेट्यावर खेटे मारुन देखील  तक्रार नोंद करुण घेण्यासाठी विलंब होणे हेच सर्व काही अधोरेखित व स्पष्ट  करत आहे.

*चारा छावणी भ्रष्टाचार प्रकरणातील दहिवडी पोलिसांच्या अकार्यक्षमपणा व जाणूनबूजून  तपासातील विलंबामुळे मोकाट फिरणारे आरोपी यांचा व त्यांचे नातेवाईकांचा ईन्कम रुट या कोट्यावधींच्या घोटाळा   या आणि अशा अनेक घोटाळ्यांमध्ये  काय आणी कसा  सहभाग आहे  हे लवकरच जनतेसमोर येईल*


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!