सातारा जिल्हा पोलीस दल आयोजित ६ वी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम
व्हिजन २४ तास न्युज (संपादक: अहमद मुल्ला )
सादिक शेख( पोलीस टाईम्स रिपोर्टर)
गोंदवले खुर्द:
आपले किल्ले आपली जबाबदारी” अनुषंगाने सातारा पोलीस दलामार्फत किल्ले दातेगड सुंदरगड टोळेवाडी, ता. पाटण या ठिकाणी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये पाटण उपविभागातील पाटण, ढेबेवाडी, कोयनानगर व मल्हारपेठ या पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.
तसेच सातारा पोलीस दलातर्फे सदर मोहिमेबाबतची लिंक प्रसारित करण्यात आल्यामुळे सातारा जिल्हयातील नागरीक देखील मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते. सदर मोहिमेदरम्यान किल्ले दातेगड सुंदरगड पायथा येथे एकत्रीत येवून चढाई ट्रेक करण्यात आली तसेच समुह तयार करुन किल्ले दातेगड सुंदरगड येथे नियोजनबध्द स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान गडावर मुख्य दरवाजा, तलवार विहीर, हनुमान व गणेश मंदीर, बालेकिल्ला परिसरात स्वच्छता करुन जैविक व अजैविक असा अंदाजे १०५ किलो कचरा गोळा करण्यात आला. गडावर शिवप्रेमी श्री मनोहर यादव सुंदर स्वराज्य प्रतिष्ठान, पाटण व श्री. अनिल बोधे सहयाद्री व्याघ्र प्रकल्प मार्गदर्शक यांनी दातेगडाबद्दल माहिती दिली.
सदर मोहिमेमध्ये श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. कमलेश मिना, परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक श्री. विवेक लावंड, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण विभाग, श्री. व्ही. के. पाडळे, पो.नि. पाटण पो. ठाणे, श्री. यु. एस. भापकर, स.पो.नि. मल्हारपेठ पो. ठाणे, श्री. एस.एस. चौधरी, स.पो.नि. ढेबेवाडी पो. ठाणे असे ०७ पोलीस अधिकारी,
४२ पोलीस अंमलदार व ८८ नागरीक, सामाजिक कार्यकर्ते व विदयार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. दिनांक १५/०१/२०२३ रोजी पासून सातारा पोलीस दलामार्फत आयोजित आपले किल्ले आपली जवावदारी मोहिमेअंतर्गत आजपर्यंत अजिंक्यतारा, वसंतगड, जरंडेश्वर ,वैराटगड, संतोषगड ,दातेगड, सुंदरगड या ठिकाणी गड मोहिम व स्वच्छता मोहिम राबविण्यात आल्या असून मोहिमेत आज अखेर ८७ पोलीस अधिकारी, ५२३ पोलीस अंमलदार, १६९० नागरीक व विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवून एकुण अंदाजे ७०४ किलो कचरा गोळा करुन योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे. सातारा पोलीस दलामार्फत प्रत्येक रविवारी सातारा जिल्हयातील एक किल्ला निवडून
सदरची मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये नागरिक, व्यापारी व तरुणांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आव्हानही सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नवीन पिढीमध्ये इतिहासाबद्दल जनजागृती होण्यास देखील मदत होणार आहे.