अहिंसा नागरी सहकारी पथसंस्था तर्फे कुमार केसरीची गदा पटकवणारा पै. हर्षल खांडेकर यांचा सत्कार
व्हिजन२४ तास न्यूज म्हसवड
By ; Ahmad Mulla
म्हसवड;
येथील अहिंसा नागरी सहकारी पथसंस्था तर्फे महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने झालेल्या कुस्ती स्पर्धे मध्ये 55 किलो वजनी गटामध्ये कुमार केसरीची गदा पटकवणारा पै. हर्षल खांडेकर यांचा सत्कार घेण्यात आला. म्हसवड पोलीस स्टेशन चे सपोनि राजकुमार भुजबळ या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते.
यावेळी अहिंसा पथसंस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी, कोच महालिंग खांडेकर, आण्णासाहेब टाकणे, अनिल लोखंडे, संचालक महावीर व्होरा, अनिल गाडे, राजेंद्र केवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हसवड पोलीस स्टेशन चे सपोनि भुजबळ साहेब यांचे हस्ते कुमार कामगार केसरी पै. हर्षल उर्फ आरु खांडेकर व कोच महालिंग खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन लिपिक अक्षय धट यांनी केले.
सत्कार समारंभात बोलताना आण्णासाहेब टाकणे म्हणाले श्रीराम कुस्ती संकुलातून अनेक मल्ल घडत आहेत व त्यांना घडवणारा कोच महालिंग खांडेकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हर्षल खांडेकरचे यश निश्चितच अभिमानास्पद आहे.
माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी मनोगत व्यक्त करताना म्हणाले वस्ताद महालिंग खांडेकर हे म्हसवड शहराची शान आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून ग्रामीण भागातील पैलवानांना त्या पद्धतीचे शिक्षण देऊन तालुकास्तरा पासून देशपातळीवर मल्ल नेले.
कोच महालिंग खांडेकर हे माण देशी फाउंडेशन व माणदेशी चॅम्पियन शी जोडले गेल्यामुळे खऱ्या अर्थाने या भागातील मल्ल तयार होऊ लागले. हर्षल खांडेकर याने आतापर्यंत मिळवलेल्या यशा वरून तो निश्चितच ऑलिम्पिक मध्ये नेत्रदिपक कामगिरी करून भारताचे नाव उज्वल करेल.
कोच महालिंग खांडेकर यांनी सांगितले कि आम्ही नुसते मल्ल घडवत नसून त्यांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करीत असतो. कोणताही युवक व्यसनाधीन होऊन भरकटला जाऊ नये याची दक्षता घेण्यात येते. अहिंसा पथसंस्थेने घेतलेला सत्कार मला व हर्षल यास तसेच आमच्या श्रीराम कुस्ती संकुलास निश्चितच बळ देईल.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भुजबळ साहेब आपल्या मनोगतात म्हणाले मी वस्ताद महालिंग खांडेकर यांच्या कुस्ती संकुलास समक्ष भेट दिली आहे. अतिशय आधुनिक पद्धतीने तालमीतील मल्लाना प्रशिक्षण दिले जाते. ग्रामीण भागात या कुस्ती क्षेत्राकडे अभिमानाने पहिले जाते. मल्लांचे कुटुंबीय वाटेल तेवढे कष्ट घेतील पण खुराकसाठी कामतरता भासू देत नाहीत ही या भागातली खासियत आहे. श्री भुजबळ साहेबांनी उपस्थित असणाऱ्या सर्व मल्लांना मार्गदर्शन करून हर्षलला शुभेच्छा व्यक्त केल्या.
आभार व्यवस्थापक दीपक मासाळ यांनी मानले.