विजय बबनराव साळुंखे हिंदी राष्ट्रभाषा प्रचार प्रसार पुरस्काराने सन्मानित*

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्यूज म्हसवड
By ;सादिक शेख  पोलीस टाईम रिपोर्टर
गोंदवले खुर्द 
           येथील रयत शिक्षण संस्थेचे, गोपालकृष्ण  या विद्यालयात कार्यरत असलेले उपशिक्षक श्री. साळुंखे विजय बबनराव यांना सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ सातारा यांचे मार्फत सन 2022- 23 या वर्षीचा *हिंदी राष्ट्रभाषा प्रचार-प्रसार पुरस्कार* प्रदान करण्यात आला.
           या कार्यक्रमासाठी मा.शबनम मुजावर, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा. मा. सौ. प्रभावती कोळेकर माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सातारा आणि मा. डॉक्टर सौ. अलका पोतदार माजी विशेष अधिकारी बालभारती,  पुणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
     हा पुरस्कार  दत्तात्रेय तापकिरे माजी शिक्षणाधिकारी , पुणे यांच्या हस्ते सपत्नीक प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे श्रेय . साळुंखे सर यांनी मा. मुख्याध्यापक, शिक्षक सहकारी वृंद,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालकवर्ग आणि आपले कुटुंबीय यांना दिले. हा पुरस्कार म्हणजे सातारा जिल्हा हिंदी अध्यापक  मंडळाचे अध्यक्ष तथा राज्य हिंदी अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री. ता. क. सूर्यवंशी यांचे कडून मिळालेला प्रसाद असल्याचे मत श्री साळुंखे सर यांनी व्यक्त केले. शिक्षणविभाग अधिकारी, रयत शिक्षण संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक  टकले एम डी सर, उगलमोगले सर,  शेख सर, श्री घोडके सर  माने सर,श्री जाधव सर,  जगदाळे सर,  घाटगे अण्णा, श्रीमती अवघडे बाई स्कूल कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवसथापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ,मुंबई विकास मंडळ मुंबई, मा सरपंच, मा उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पालक, गोंदवले खुर्द ग्रामस्थ यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!