डबल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये एपीआय राजकुमार भुजबळ यांनी प्रथम क्रमांक मिळविला .
व्हिजन २४ तास न्यूज
BY; Ahmad Mulla
म्हसवड
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी माण तालुका बॅडमिंटन क्लबने खुल्या डबल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले होते या आयोजित खुल्या डबल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ए पी आय राजकुमार भुजबळ यांनी प्रथम क्रमांक मिळविला .त्याचबरोबर स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू हा वैयक्तिक सन्मानही मिळवला. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले या विजयामध्ये सहकारी खेळाडू मोरे सर यांचा मोठा वाटा आहे .त्यांच्याबरोबरच्या समन्वयामुळे स्पर्धेतील विजय शक्य झाला. आजच्या व्यस्त जीवनशैलीत प्रत्येकाचे शरीराकडे कळत नकळत दुर्लक्ष होते. त्या दृष्टीने एखादा खेळाचा छंद प्रत्येकाला असावा. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मदत मिळते. ज्याप्रकारचे माण तालुक्यात दहिवडी मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक फ्लोअर चे तसेच दहिवडी कॉलेजमध्ये वुडन फ्लोवरचे असे ०४ बॅडमिंटन कोर्ट उपलब्ध आहेत.
असेच कोर्ट आपल्या म्हसवड मध्येही उपलब्ध झाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे
या मिळवलेल्या यशाबद्दल पत्रकारांनी एपीआय भूजबळ यांचे अभिनंदन केले.