आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल सहारा उद्योग समूहाकडून त्यांचा जाहीर सत्कार
व्हिजन २४ तास न्यूज
BY ;Ahmad Mulla
म्हसवड;
राष्ट्रवादी काँग्रेस चा जन सामान्यांना आवडणारा लोकप्रिय चेहरा,कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार आ.रोहित पवार यांची नुकतीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. याचे औचित्य साधून सहारा उद्योग समूहाचे अजीम तांबोळी यांनी त्यांचा बारामती कृषी प्रदर्शनामध्ये माणदेशी घोंगडी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या सत्कार प्रसंगी सहारा पान आणि उद्योग समूहाविषयीं बोलताना रोहित दादा म्हणाले की, समाजिक कार्यात सतत पुढाकार घेणारे आमचे मित्र अजीम तांबोळी यांचा मला सार्थ अभिमान वाटतो. त्यांनी अनेक समाजिक कामे केलेली मी अनुभवली आहेत. पाणी फाउंडेशन ला केलेली मदत असेल, केरळ ला आलेला पूरग्रस्तांना केलेली मदत असेल, सांगली पूरग्रस्तांना केलेली मदत असेल महत्वाचे म्हणजे ही मदत करताना आपल्या पान विक्रीच्या व्यवसायातील प्रत्येक पानातील एक रुपया काढून हजारो रुपयांची मदत त्यांनी केली.
लक्षनीय बाब म्हणजे कोरोना महामारीत सर्वकाही बंद होते म्हसवड सारख्या मोठ्या शहरामध्ये वेडसर लोक, अनाथ लोक यांचे जेवनाचे प्रचंड हाल होत होते, कोणी त्यांना पाणी सुद्धा देत नव्हते अशावेळी आपली आई आजारी असताना स्वत एकुलता एक आधार तरीही 20 ते 25 अनाथ भोळसर, वेडसर लोकांना दोन वेळेचे जेवणाची सोय या अवलीयाने केली. कित्येक लोकांना जे जमले नाही, जे कोरोना ला घाबरून घरातून बाहेर सुद्धा निघत नव्हते अशावेळी या लोकांचा मसीहा अजीम भाई होते. एवढेच नाही तर रमजान सारखा पवित्र सण या लोकांबरोबर या अवलीयाने साजरा केला.
त्यांनी सहारा उद्योग समूहास शुभेच्छा दिल्या तुमच्या हातून यापेक्षाही आणखी सेवा घडण्यासाठी प्रेरणा देऊ केली. आणि भविष्यात काही मदत लागल्यास करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रम प्रसंगी कृषितज्ञ् राजेंद्रजी पवार, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.