नवरात्रोत्सवात दहिवडी पोलिसांची नागरिकांना अनोखी भेट!

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

दहिवडी :प्रतिनिधी 

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलिसांनी नागरिकांना अनोखी भेट दिली आहे. गहाळ आणि चोरी झालेल्या तब्बल ७ लाख २० हजार रुपये किमतीच्या २९ मोबाईल हँडसेटचा शोध घेऊन ते संबंधित नागरिकांना परत करण्यात आले. दहिवडी पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

      दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते, तसेच काही मोबाईल चोरीला गेले होते. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले होते. या पथकाने सीईआयआर (CEIR) पोर्टल आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

      तांत्रिक तपासाच्या मदतीने सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून एकूण २९ मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर हे सर्व मोबाईल संबंधित नागरिकांना परत देण्यात आले. हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी दहिवडी पोलिसांचे आभार मानले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी

ही कामगिरी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रहार खाडे, पोलीस हवालदार बापू खांडेकर व सचिन जगताप, पोलीस नाईक नितीन धुमाळ तसेच पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे, महेंद्र खाडे, अजिनाथ नरबट आणि आसिफ नदाफ यांनी सहभाग घेतला.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *