इंदोली येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
इंदोली (ता. कराड) :प्रतिनिधी
मौजे इंदोली (ता. कराड) येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर झालेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून करण्यात आले. सुमारे १० लाख रुपयांच्या या विकासकामासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार (माऊली) यांच्या विशेष प्रयत्नांमुळे तसेच कराड उत्तरचे शिवसेना तालुकाप्रमुख तुषार रामराव निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाला आहे.
या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार (माऊली) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कराड उत्तर तालुकाप्रमुख तुषार निकम, उपजिल्हाप्रमुख शंकरराव वीर, कराड शहरप्रमुख राजेंद्र माने, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सुलोचना पवार, उपजिल्हाप्रमुख विमलताई सुपनेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच इंदोली गावचे सरपंच बाबुराव माने, माजी सरपंच गोपीनाथ कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच गावातील शिवसैनिक जीवन शिंदे, महेंद्र पवार, सचिन कदम, कृष्णात मोकाशी, प्रसाद नलावडे आदी उपस्थित होते.
यावेळी उंब्रज विभागातील सचिन जाधव, पिनू सावकर, रवी हजारे, विक्रम वाघमारे, राहुल जाधव (चरेगाव), निलेश माने, दिनेश घाडगे, कंत्राटदार गौरव भोसले तसेच इंदोली, उंब्रज, चरेगाव व तळबीड परिसरातील शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विकासकामामुळे इंदोली गावातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यास मदत होणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

