बारामतीतील शासकीय वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालयांना स्व. अजित (दादा) पवार यांचे नाव

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय यांचे नामांतर करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे नामकरण “स्व. अजित (दादा) पवार सर्वोपचार रुग्णालय, बारामती” असे करण्यात आले आहे. तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे नामकरण “स्व. अजित (दादा) पवार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, बारामती” असे करण्यात येणार आहे.

शासनाने २ मार्च २०२६ रोजी याबाबत अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. संबंधित संकुलातील संकेतस्थळे, अभिलेख, नोंदवही, फलक व अधिकृत पत्रव्यवहारात आवश्यक ते बदल करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय तसेच संबंधित संस्थांच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

स्व. अजित (दादा) पवार यांनी उपमुख्यमंत्री व विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम करताना राज्याच्या आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले होते. जिल्हास्तरीय वैद्यकीय सुविधा मजबूत करणे, नवीन वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालये सुरू करणे तसेच आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता वाढविणे यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला होता.

बारामती परिसरातील आरोग्य व शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी त्यांच्या योगदानाची दखल घेऊन या संस्थांना त्यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *