केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसळा (रायगड) – सुशील यादव
तालुक्यात वाचन संस्कृती जोपासणारे नामांकित केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर माजी सभापती महादेवराव पाटील तसेच कृषी अधिकारी डि.जी.शिंदे यांनी नेताजी व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून नेताजींचे देशप्रेम,त्याग आणि बाळासाहेब ठाकरे यांचे प्रभावी नेतृत्व,विचारधारा व सामाजिक योगदान यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाला वाचनालय संचालक मंडळाचे अध्यक्ष संजय खांबेटे,सचिव अशोक काते, कृषि पर्यवेक्षक विनोद सोनवणे,एस.डी.गोडगे,एस.जी.जामकर,ग्रंथपाल उदय करडे,लिपीक सायली चोगले, तसेच प्राची मेंदाडकर यांची उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांनी अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आणि वाचन संस्कृती अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

