आचार्य श्रींच्या प्रेरणेने सुरु झालेल्या गोशाळेस अहिंसा नागरी पतसंस्थेचा धनादेश सुपूर्द

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (ता. माण) :
आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांच्या प्रेरणेने म्हसवड येथे सुरु करण्यात आलेली “वात्सल्य वारिधी गोशाळा” आज अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत असून समाजातील सेवाभावी उपक्रमाचे उत्तम उदाहरण ठरत आहे. आचार्य श्रींच्या वाढदिवसानिमित्त या गोशाळेला आर्थिक सहाय्य म्हणून अहिंसा नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने धनादेश प्रदान करण्यात आला.

हा धनादेश माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीनभाई दोशी यांच्या हस्ते गोशाळेचे अध्यक्ष शैलेश गांधी व प्रतीक दोशी यांचेकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गोशाळा सुरु झाल्यापासून स्थानिकांसह अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीने गाईंची निगा राखली जात असून गोरक्षणाचे हे कार्य गावामध्ये विशेष दखलपात्र ठरत आहे.

यावेळी बोलताना चेअरमन नितीनभाई दोशी यांनी सांगितले की, “गोपाळन व गोरक्षण हे आपल्या संस्कृतीचे जतन करणारे कार्य आहे. या सेवाकार्यास हातभार लावणे ही संस्थेची सामाजिक जबाबदारी आहे.”

समाजहितासाठी अशा प्रकारच्या दानशूर उपक्रमांची गरज असल्याचे मतही उपस्थितांनी व्यक्त केले.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *