पाण्यावर चालणाऱ्या गॅस शेगडीचा यशस्वी प्रयोग – पर्यावरणपूरक नवकल्पनेचं श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
सातारा/कराड:
पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल उचलत आमदार महेश शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि कृष्णा विकास महामंडळाच्या माध्यमातून पाण्यावर चालणारी गॅस शेगडी तयार करण्यात आली आहे. या नवकल्पनेचं प्रात्यक्षिक बेंगळुरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ मुख्य आश्रमात करण्यात आलं. यावेळी हजारो लोकांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.

प्रात्यक्षिकावेळी आमदार महेश शिंदे यांनी शेगडीच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली. या शेगडीमुळे हायड्रोजन-कार्बन मिश्रणाच्या धोक्यांपासून बचाव होणार असून, कमी खर्चात व निसर्गाच्या अन्नसाखळीवर परिणाम न होता इंधनाची गरज भागवता येणार आहे.

श्री श्री रविशंकर यांनी या पर्यावरणपूरक उपक्रमाचं विशेष कौतुक केलं. त्यांनी आशा व्यक्त केली की, ही शेगडी सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्यास एक नैसर्गिक क्रांती घडवू शकते. शेगडीमुळे केवळ इंधनाचा खर्च कमी होणार नाही, तर नद्यांचे, जंगलांचे आणि इतर नैसर्गिक संसाधनांचे रक्षणही शक्य होईल.

या अभिनव उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यासह राज्यभरात आमदार महेश शिंदे यांचं विशेष कौतुक होत असून, ही संकल्पना भविष्यातील इंधन स्वावलंबन आणि पर्यावरण संवर्धनासाठी मोलाची ठरणार आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!