म्हसवड पोलिसांची थरारक कामगिरी – अवघ्या चार तासांत मुद्देमालासह दरोडेखोरांना गजाआड
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (ता. माण) –
विरळी येथील शिवनेरी अवतार ढाब्याजवळ झालेल्या दरोड्याचा अवघ्या चार तासांत म्हसवड पोलिसांनी छडा लावून लुटलेला ५ लाख १२हजाराचा मुद्देमाल जप्त केला व सहा सराईत दरोडेखोरांना अटक केली.
या दरोड्यात दरोडे खोरांनी वापरलेली पिस्तूल, तलवारी, कोयते, वाहने आणि चोरलेले सोन्याचे दागिने असा 100 टक्के मुद्देमाल जप्त करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना मोठे यश मिळाले आहे.
या दरोड्याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी
दि. २० एप्रिल रोजी रात्री सुमारे ९.४५ च्या सुमारास नागेश मोहन दीडवाघ (रा. दीडवाघवाडी) हे त्यांच्या मित्र आणि सासऱ्यासोबत जेवण करून परतत असताना दोन मोटरसायकलवरून आलेल्या 6-7 अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉड, तलवार, कोयता आणि पिस्तूल दाखवून त्यांनी सुमारे 5 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल – सोन्याच्या चैन्या व रोख रक्कम लुटली. या घटनेची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 106/25 अन्वये दाखल करण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी त्यांच्या पथकासह तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीद्वारे अवघ्या चार तासांत सर्व 6 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, वाहने आणि संपूर्ण लुट जप्त करण्यात आली.
अटक आरोपींची नावे:
1. विजय बाबा शिंदे (वय २४) रा. वळई ता. माण जी. सातारा ,२) समाधान सिदा गोरड (वय २२ रा. विरळी ता. माण जी. सातारा ),३)प्रवीण सुरेश गोरड (वय २९ रा. विरळी ता. माण जी. सातारा ), ,४) करण नवनाथ गोरड (वय २१ रा. विरळी ता. माण जी. सातारा ),
५) विशाल महादेव नलवडे ( वय २८ रा. विरळी ता. माण जी. सातारा ), ,६)अक्षय महादेव गोरड ( वय २८ रा. विरळी ता. माण जी. सातारा ),
हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून याआधीही त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई माननीय अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे,अमर नारनवर, सुभाष भोसले, भगवान सजगणे, नवनाथ शिरकुळे,श्रीकांत सुद्रिक, अभिजीत भादुले, सतीश जाधव, महावीर कोकरे.अधिकाऱ्यांनी पार पाडली:
ही जलद आणि प्रभावी कारवाई केल्याबद्दल म्हसवड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.