म्हसळयात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, कांदळवाडा गाव राष्ट्रवादीच्या विकास रथात
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसळा – सुशील यादव
म्हसळा तालुक्यातील कांदळवाडा गाव, ज्याने ३० वर्षांपासून विकासाची प्रतीक्षा केली होती, अखेर शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. “वाकू पण मोडणार नाही” असे वचन घेतलेल्या या कट्टर शिवसैनिकांनी गावाच्या विकासासाठी पक्षांतराचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेला मोठी भगदाड
कांदळवाडा ग्रामस्थांनी विकासाच्या अभावी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने झुकाव घेतला आहे. खासदार सुनिल तटकरे यांच्या विकास कामांमुळे प्रेरित होऊन, गावाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकास रथात प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे म्हसळा तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
विकासाचा अभाव आणि बदललेले राजकीय समीकरण
१९९४/९५ पासून कांदळवाडा गाव विकासाच्या दृष्टीने मागे राहिले होते. अनेक कट्टर शिवसैनिकांनी पक्ष सोडला तरीही गावाने हिंदुत्व विचारधारेची कास धरली होती. परंतु, गेल्या ३० वर्षांच्या विकासाच्या वंचनेमुळे अखेर गावाने शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला.

खासदार तटकरे यांच्या विकास कामांना प्रोत्साहन
खासदार सुनिल तटकरे यांनी कांदळवाडा गावातील बापदेव मंदिर सभागृहाच्या बांधकामासाठी २५ लाख रुपयांचा निधी दिला असून, त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. गावच्या महिला अध्यक्षा आणि सरपंच पांडुरंग बने यांनी या निर्णयाचा समर्थन करताना सांगितले, “साहेब, आम्ही तुमच्या विकास कामांची वाट पाहत होतो, आज अखेर तो सुवर्ण दिवस आला आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत
खासदार तटकरे यांनी आश्वासन दिले की कांदळवाडा गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही. त्यांनी पुढील विधानसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतपेटीत घड्याळाचा गजर करण्याचे आवाहन केले.


