सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन जिल्हा अध्यक्ष प्रशांत कदम व सर्व माजी सैनिकांच्या मागणीला अखेर यश आले असून सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात “सैनिक कक्ष” स्थापन केले गेले आहे.
सातारा जिल्हा अधिकारी जितेंद्र डूडी यांच्या सूचनेनुसार व सैनिक फेडरेशन च्या मागणीनुसार सर्व तालुका स्तरावर तहसील कार्यालयामध्ये आजी/माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय यांच्या समस्या, अडीअडचणी, सोडवण्यासाठी, निराकरण करण्यासाठी”सैनिक कक्ष” स्थापनेसाठी परिपत्रक काढून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदार यांना सुचित केले गेले होते.
त्यानुसार तहसीलदार विजय पवार यांनी पाटण तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी यांना परिपत्रक काढून दि.27/2/2024 रोजी सैनिक मेळावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये
पाटण तालुका येथे .उपविभागीय अधिकारी पाटण सुनील गाडे यांचे अध्यक्षतेखाली सैनिकांचा “सैनिक मेळावा” घेऊन सैनिकाच्या समस्या निराकरण करण्यासाठी स्वतंत्र “सैनिक कक्ष” स्थापन. केले
या मेळाव्यामध्ये उपविभागीय अधिकारी सुनील गाडे यांनी सैनिकांच्या तक्रारी अर्जाचे निराकरण केले व सैनिकांना मार्गदर्शन केले व त्यांनी मार्गदर्शनामध्ये अवगत केले की पाटण तालुक्यातील आजी-माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय, शहीद जवान कुटुंबिय, यांच्या महसूल विभागातील , अन्य प्रशासकीय विभागातील कोणत्याही समस्या असो त्या प्रथम सोडवल्या जातील, व यासाठी तहसीलदार कार्यालय पाटण येथे “सैनिक कक्ष” स्थापन केले आहे तरी सर्व आजी/ माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी सैनिक कक्षामध्ये आपले तक्रारी अर्ज जमा करावेत याची दखल तात्काळ घेतली जाईल असे आश्वासित त्यांनी मेळाव्यामध्ये केले.
या प्रसंगी पाटण तालुका पंचायत समिती गट विकास अधिकारी रमेश शेलार, उप अधीक्षक भूमि अभिलेख . आर.आर.तळपे,.विजय घोडके तहसील कार्यालय, व सर्व प्रशासकीय विभागातील प्रतिनिधी व प्रशांत कदम अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन व अमृत वीर जवान अभियान माजी सैनिक संघटना प्रतिनिधी व जिल्हा संरक्षण समिती सदस्य, व पाटण तालुका सैनिक फेडरेशन अध्यक्ष .विक्रम वरेकर , कार्याध्यक्ष प्रकाश मसुगडे,तानाजी पडवळ सैनिक फेडरेशन पाटण शहर,कोयना,विभागप्रमुख,.दिलीप पवार सैनिक फेडरेशन तारळे विभागप्रमुख, बाबुराव शिवदास सैनिक फेडरेशन चाफळ विभाग प्रमुख,उत्तम टोळे व श्शिवाजी कोळेकर सैनिक फेडरेशन ढेबेवाडी विभाग प्रमुख,.प्रभाकर नलवडे मल्हारपेठ,मारुल विभाग प्रमुख सैनिक फेडरेशन,माजी सैनिक किसन कदम,श्री.सुभाष पाटील व तालुक्यात सर्व विभागातील आजी/ माजी सैनिक,त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय बहुसंख्येने उपस्थित होते.