संरक्षण समितीमध्ये माजी सैनिक प्रशांत कदम जिल्हाध्यक्ष सैनिक फेडरेशन यांची निवड झाली आहे त्यांना निवडीचे पत्र मेजर आनंद पाथरकर सेना मेडल (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा यांच्या हस्ते देण्यात आले.त्यामुळे आता आजी/ माजी सैनिक,त्यांचे कुटुंबीय,शहीद जवान कुटुंबीय यांना पोलीस प्रशासन दरबारी प्रलंबित तक्रारी तात्काळ सुटतील व सैनिकांना न्याय मिळणे सोपे होईल. असे प्रशांत कदम यांनी निवड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत
सातारा जिल्ह्यामध्ये संरक्षण समिती गठीत झाली आहे
सैनिक फेडरेशन सातारा जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम व सर्व पदाधिकारी यांनी आजी/ माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय यांना संरक्षण देण्याबाबत जिल्हास्तरीय समिती गठीत करणेबाबत महाराष्ट्र शासन निर्णय परिपत्रकानुसार दि.24/08/2023 रोजी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख . समीर शेख यांना सैनिक फेडरेशन सातारा जिल्हा यांचे वतीने निवेदन देऊन मागणी केली होती. निवेदनाची दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख यांनी दि. 5/1/2024 रोजी परिपत्रक काढून जिल्हास्तरीय समिती गठित केली आहे या समिती मध्ये सर्व 11 तालुक्यातील माजी सैनिक सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
समितीचे कामकाज: खालील प्रमाणे असेल
1) सदर समिती सैनिकांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांच्या तक्रारी बाबतचा आढावा घेईल
2) जिल्ह्यातील सैनिकांच्या पत्नीचे किंवा माजी सैनिकांच्या विधवा पत्नीचे तिच्यावर अन्याय झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केल्यास त्याची तात्काळ दखल घेऊन प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
3) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दर महिन्याला तालुक्याला भेट देऊन सैनिकाच्या कुटुंबावरील अन्याय अत्याचाराची माहिती घेतील.
तसेच या समिती मध्ये (1)जिल्हा पोलीस अधीक्षक – अध्यक्ष (2) जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी – सदस्य (3) जिल्ह्याचे सैनिक कल्याण अधिकारी -सदस्य 4) एक महिला पोलीस अधिकारी -सदस्य (5) जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक माजी सैनिक – सदस्य अशा प्रकारे संरक्षण समिती गठीत केली आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणी संरक्षण समिती गठित झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व आजी/ माजी सैनिक,त्यांचे कुटुंबीय,शहीद जवान कुटुंबीय यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.