माय कशीही असो, ती मायच असते….! बाल संगोपन व पुनर्वसन केंद्र अध्यक्षा ममतादीदी सपकाळ.
व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
गणेश मिंड
इंदापुर (प्रतिनिधी)
माय अडाणी, सुशिक्षित, भोळी भाळी, आंधळी-बहिरी कशीही असली तरीही ती शेवटी मायच असते, असे प्रतिपादन पुणे (मांजरी) येथील सप्तसिंधू महिला आधार, बाल संगोपन व पुनर्वसन केंद्राच्या अध्यक्ष ममतादीदी सपकाळ यांनी केले. अ. भा. मराठा महासंघ द्वारा संचलित छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय यांच्यावतीने शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेतील द्वितीय पुष्पप्रसंगी ‘माय, ही मायच असते’ या विषयावर त्या बोलत होत्या.


