म्हसवड येथील मायणी चौकात भीषण अपघात , सातारा येथील युवक ठार तर युवतीचे दोन्ही पाय तुटले 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड 
म्हसवड येथील सातारा – पंढरपूर महामार्गावर मायणी चौकात दुचाकीला पाठीमागुन डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला आहे, तर त्याच्या पाठीमागे बसलेल्या युवतीचे दोन्ही पाय तुटल्याने घटनास्थळी रक्ताचा व मांसाचे तुकड्याने अनेकांचे ह्रदय पिळवटले. अपघातातील युवक व युवती हे   करंजपेठ सातारा येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असुन म्हसवड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरिक्षक राजकुमार भुजबळ यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमी असलेल्या युवतीला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. सदर अपघात इतका भिषण होता की अपघातातील मृत युवकाच्या डोक्याचा अक्षरशा चेंदामेंदा झाल्याच्या दृष्याने अनेकांचे डोळे पानावले.
     याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की माण तालुक्यातील म्हसवड येथील मायणी चौकात सातारा लातूर महामार्गावर डंपरने दुचाकी स्वराला चिरडल्याने एकजण जागीच ठार झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना  दि २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता घटना घडली. सातारा येथील  अभिषेक  सुनिल जाधव  वय २५ रा करंजेपेठ सातारा असे मृतकाचे नाव आहे. तर नेहा जयवंत सावंत वय २२ रा.नागेवाडी सातारा असे जखमीचे नाव आहे.
         लातूर महामार्गावर म्हसवड येथील मायणी चौकात सातारा – लातूर महामार्गावर दुचाकी क्रमांक एम एच ५० एफ ५७५५ होन्डा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी व नंबरप्लेट नसलेला व मुरुम भरलेला डंपर म्हसवड हुन दहिवडी कडे जात असताना मायणी चौकात अचानक डंपरने मायणीकडे जाण्यासाठी वळण घेतले . त्यामुळे दुचाकीस्वार अभिषेक  जाधव यांच्या डोक्यावरून व नेहा सावंत यांच्या दोन्ही पायावरून डंपर गेल्याने अभिषेक  जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर नेहा सावंत ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांचे दोन्ही पाय तुडले आहेत. डंपरचालक घटनास्थळावरुन पळून गेला असून त्याचा शोध म्हसवड पोलीस घेत आहेत
       अपघाताची माहिती मिळताच म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला .जखमी नेहा सावंत हिला म्हसवड येथे खाजगी दवाखाण्यात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल सातारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच मृत अभिषेक जाधव यांचा मृत्यदेह उत्तरीय तपासणीसाठी प्रा.आ.केंद्र दहिवडी येथे रवाना केले. डंपरचालक घटनास्थळावरुन  पळून गेला असून  पुढील तपास म्हसवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ करीत आहेत.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!