तळबीड पोलीस ठाण्याच्या वतीने वसंतगड येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते 

कराड : प्रतिनिधी
सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी तळबीड पोलीस ठाणे यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक वसंतगड येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

पर्यावरणाचे संवर्धन, वृक्षांचे महत्त्व आणि आगामी पिढीसाठी हरित व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने वसंतगड परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. “वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा” हा संदेश यावेळी देण्यात आला.

या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी तळबीड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, गृहरक्षक दलाचे जवान, जिद्द करिअर अकॅडमीचे युवक-युवती, टीम वसंतगड, पोलीस पाटील तसेच तळबीड गावातील ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमास सहकार्य केले.

पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य न करता सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेत असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले. वसंतगड परिसरातील वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

सामूहिक सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *