म्हसवडनगरीत विठू नामाचा गजर! माणगंगा शैक्षणिक संकुल मासाळवाडीच्या बालचमूंचा रंगला दिंडी सोहळा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 
म्हसवड:प्रतिनिधी 

म्हसवड, प्रतिनिधी :

आषाढी एकादशीनिमित्त माणगंगा शैक्षणिक संकुल (मासाळवाडी) व माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची भव्य दिंडी शुक्रवारी (दि. १७) सकाळी उत्साहात पार पडली. टाळ-मृदंगाचा गजर, अभंग, वारकरी वेशभूषा आणि “ज्ञानोबा माउली तुकाराम”च्या जयघोषाने संपूर्ण म्हसवड शहर विठ्ठलमय झाले.

सकाळी ८.३० वाजता म्हसवड नगरपालिकेपासून दिंडीला प्रारंभ झाला. वारकरी वेशातील विद्यार्थी, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी आणि टाळ-मृदंगाच्या साथीने निघालेल्या दिंडीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

नगरपालिकेसमोर पार पडलेल्या पहिल्या रिंगण सोहळ्यात संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांनी भिंत चालवल्याचा प्रसंग सजीव स्वरूपात साकारण्यात आला होता. या आकर्षक देखाव्याचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. अभंगांच्या तालावर संचालिका तथा नगरसेविका डॉ. सविता मासाळ, नगराध्यक्ष सौ. पूजा वीरकर, अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, नगरसेविका सौ. स्नेहल सूर्यवंशी, नगरसेवक युवराज (काका) सूर्यवंशी, विजय धट, सभापती सौ. दिपाली धनाजी शिंदे, नगरसेवक लखन लोखंडे, धनाजी शिंदे, डॉ. सतीश मासाळ, कृष्णदेव मदने, प्रजोत कलढोणे, शमीम सय्यद मॅडम, प्राचार्य रावसाहेब मासाळ तसेच पॅरामेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्य करमाळकर मॅडम यांनीही सहभाग घेत ठेका धरला.

पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी फुगड्या, नृत्य आणि अभंग सादरीकरणातून भक्तिमय वातावरण अधिक खुलवले. यावेळी अजित मासाळ, दिलीप मासाळ, दादा मासाळ, नवनाथ मासाळ, विशाल मासाळ, गुरव मॅडम आणि सचिन सरतापे यांच्या वतीने बालचमूंना खाऊचे वाटप करण्यात आले.

दिंडीचे नियोजन तनूश्री वेदपाठक, निकिता सरतापे, प्रतीक्षा सुतार, म्हेत्रे मॅडम, राऊत मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. संस्थेचे समन्वयक राहुल फुटाणे सर आणि ‘ओम कला अविष्कार ग्रुप’चे महेश सोनवले (आप्पा) यांचे मार्गदर्शन लाभले.

   दिंडीचे नियोजन तनूश्री वेदपाठक, निकिता सरतापे, प्रतीक्षा सुतार, म्हेत्रे मॅडम, राऊत मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. संस्थेचे समन्वयक राहुल फुटाणे सर आणि ‘ओम कला अविष्कार ग्रुप’चे महेश सोनवले (आप्पा) यांचे मार्गदर्शन लाभले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *