ढाकणी येथे विहिरीत पडून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड, प्रतिनिधी :

माण तालुक्यातील ढाकणी गावच्या हद्दीत विहिरीत पडून एका ७० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीची ओळख दादा साधू बनगर (वय ७०, रा. गट्टेवाडी, ता. माण) अशी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादा बनगर हे १४ जुलै रोजी सकाळपासून बेपत्ता होते. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतल्यानंतर १६ जुलै रोजी सकाळी ढाकणी गावच्या हद्दीतील पोपट सरतापे यांच्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. विहिरीत पडून बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी मुलगी सौ. संगीता मोहन गोरड यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक २१/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि संदिप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हांगे करत आहेत .


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *