ओगलेवाडीत मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद शेकडो नागरिकांनी घेतला लाभ; २० जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते | कराड प्रतिनिधी
ओगलेवाडी (ता. कराड) येथे शिवजयंती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसैनिक मा. गणेश जांभळे यांच्या पुढाकारातून हे शिबिर पार पडले.
कै. रा.वि. लाहोटी लायन्स चॅरिटेबल आय हॉस्पिटल, कराड यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचे उद्घाटन सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरास ओगलेवाडी व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो नागरिकांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली. यामध्ये सुमारे २० गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याने अनेकांना दिलासा मिळाला.
कार्यक्रमास कराड उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले, युवा सेना तालुका प्रमुख विक्रम पिसाळ, तालुका संघटक उमेश आतकरे, उपतालुका प्रमुख मनोज गायकवाड, ओगलेवाडी शहर प्रमुख अमजद मुसांडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश जांभळे तसेच अभिजीत माने आदी मान्यवर उपस्थित होते.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी गणेश जांभळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा मोफत उपलब्ध झाली असून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

