म्हसवड एमआयडीसीला गती देण्याची मंत्री जयकुमार गोरे यांची मागणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

नवी दिल्ली :प्रतिनिधी

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा.श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांनी म्हसवड एमआयडीसीच्या उर्वरित प्रक्रिया तातडीने पूर्ण करून या प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री मा. पियुष गोयल यांच्याकडे नवी दिल्ली येथे केली.

या वेळी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबतही चर्चा होऊन मंत्री गोरे यांनी निवेदन सादर केले. या बैठकीस माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित होते.

म्हसवड येथील इंडस्ट्रियल कॉरिडॉर एमआयडीसीमुळे या परिसरात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होणार असून स्थानिक तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. औद्योगिक वसाहतीला पाणी व वीज पुरवठा स्वयंपूर्ण करण्याबरोबरच, शेतीपूरक व रोजगारक्षम उद्योगांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार आहे.

मा. गोरे यांनी गेल्या १५-२० वर्षांपासून माण-खटाव मतदारसंघाच्या विकासासाठी जलक्रांती, हरितक्रांती, औद्योगिक क्रांती आणि शैक्षणिक क्रांतीचे स्वप्न साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. उरमोडी-जीहे कठापूर योजना, कृष्णामाईचे पाणी माण-खटावमध्ये आणणे, तसेच टेंभू उपसा सिंचन योजनेचे तब्बल ७५० कोटी रुपयांचे काम सुरू करणे ही त्यांच्या कार्याची महत्त्वाची उदाहरणे आहेत.

👉 म्हसवड एमआयडीसीमुळे या दुष्काळी भागाच्या औद्योगिक प्रगतीला नवी दिशा मिळून हजारो तरुणांच्या भवितव्यास रोजगाराचे नवे दालन खुले होणार आहे. 🚩

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *