कराडकरांचा जीव धोक्यात! NHI विभागाचे दुर्लक्ष – बंदिस्त गटारावरील बांधकाम तुटलेल्या अवस्थेत
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड (प्रतिनिधी) –
कराड-मलकापूर परिसरातील नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कोल्हापूर नाका ते नांदलापूर या सहा पदरी पुलाच्या बांधकामाचा वेग संत गतीने असल्याने जनतेत आधीच नाराजी आहे. त्यातच संगम हॉटेल ते चॅरिटेबल हॉस्पिटल मार्गावरील बंदिस्त गटारावरील (ड्रेनेज) बांधकाम ठिकठिकाणी तुटलेले असून काही ठिकाणी झाकणेच गायब झाली आहेत.
या मार्गावर लहान मुले, महिला, वृद्ध नागरिकांची मोठी वर्दळ असते. बांधकामातील हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे गटारातील घाण पाण्यासह रस्त्यावर वाहत आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कराडकरांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, “हायवे रस्ते विकास महामंडळाचे हे अक्षम्य दुर्लक्ष आहे” अशा शब्दांत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
या प्रकरणी व्हिजन न्यूजने NHI विभागाचे अधिकारी बक्षी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी “तात्काळ पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करू” असे आश्वासन दिले आहे.

